PM Modi Fun Time With Kids: कर्नाटकातील प्रचारातून वेळ काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली लहान मुलांसोबत चेष्टा-मस्करी, व्हिडिओ व्हायरल (Watch)

यावेळी पंतप्रधानांनी मुलांशी गप्पा-गोष्टी केल्या, चेष्टा-मस्करी केली.

PM Modi Fun Time With Kids

पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पीएम मोदींनी मंगळवारी (2 मे) कलबुर्गी येथे काही लहान मुलांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी मुलांशी गप्पा-गोष्टी केल्या, चेष्टा-मस्करी केली. पीएम मोदींनी मुलांना बोटांनी अनेक आकार बनवण्यास सांगितले, जे मुलांनी केले आणि दाखवले. यानंतर पीएम मोदींनी मुलांना विचारले की, तुम्हाला काय बनायचे आहे? यावर एका मुलाने उत्तर दिले की, मला डॉक्टर व्हायचे आहे तर दुसऱ्या मुलाने सांगितले की, त्याला पोलीस व्हायचे आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (हेही वाचा: आता इयत्ता सहावीपासून शिकवले जाणार AI आणि Coding; लवकरच सीबीएसई अभ्यासक्रमात होणार समाविष्ट)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement