PIB Fact Check: बनावट 'CoWIN' वेबसाइटपासून सावध रहा; होऊ शकते मोठे नुकसान, जाणून घ्या सविस्तर

फसवेगिरी करणाऱ्या लोकांकडून एक बनावट कोविन साईट (CoWIN Site) तयार करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत प्रेस ब्युरो ऑफ इंडियाने माहिती दिली आहे.

PIB Fact Check

PIB Fact Check: भारतामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात डिजिटलायझेशन होत आहे. एकीकडे सरकार नागरिकांच्या सोयीसाठी अनेक पोर्टल, वेबसाईट सुरु करत आहे, तर दुसरीकडे सायबर फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. जनतेच्या वैयक्तिक माहितीची चोरी ही बाब आर्थिक फसवणुकीइतकीच गंभीर होत चालली आहे. आता फसवेगिरी करणाऱ्या लोकांकडून एक बनावट कोविन साईट (CoWIN Site) तयार करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत प्रेस ब्युरो ऑफ इंडियाने माहिती दिली आहे. त्यांच्यामते ‘https://demo.co-vin.in’ नावाची एक वेबसाइट कार्यरत असून, ती अधिकृत कोविन साईट ‘https://cowin.gov.in’ ची बनावट साईट आहे. पीआयबीने या खोट्या वेबसाइटवर कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नका असा सल्ला दिला आहे. पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, अधिक माहितीसाठी COWIN ची अधिकृत वेबसाइट https://cowin.gov.in ला भेट द्या. (हेही वाचा: RBI Fine On ICICI-YES Bank: RBI ने येस बँक आणि ICICI बँकेला ठोठावला मोठा दंड; शेअर्सवरही दिसून आला परिणाम)

पहा पोस्ट-

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement