Paris Olympics 2024 Archery Live Streaming In India: तिरंदाजीती तरुणदीप रायवर असतील सर्वांच्या नजरा , जाणून घ्या केव्हा, कुठे आणि कसे पहायचे लाइव्ह स्टीमिंग

पॅरिस ऑलिम्पिक 2024 या क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठ्या महाकुंभचा आज पाचवा दिवस आहे. आज भारतीय दिग्गज नेमबाजी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बॉक्सिंग, तिरंदाजी आणि घोडेस्वारी स्पर्धांमध्ये आपली प्रतिभा दाखवतील.

Paris Olympics 2024 Archery Live Streaming In India: तिरंदाजीती तरुणदीप रायवर असतील सर्वांच्या नजरा , जाणून घ्या केव्हा, कुठे आणि कसे पहायचे लाइव्ह स्टीमिंग
Paris Olympics (Photo Credit - X)

Paris Olympics 2024 Day 5 Live Streaming: पॅरिस ऑलिम्पिक 2024 या क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठ्या महाकुंभचा आज पाचवा दिवस आहे. आज भारतीय दिग्गज नेमबाजी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बॉक्सिंग, तिरंदाजी आणि घोडेस्वारी स्पर्धांमध्ये आपली प्रतिभा दाखवतील. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत दोन कांस्यपदके जिंकली आहेत. तथापि, ऑलिम्पिकच्या पाचव्या दिवशी (३१ जुलै) भारताचा एकही पदक सामना नाही.आज, भारतीय खेळाडूंकडे नेमबाजी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बॉक्सिंग, तिरंदाजी आणि घोडेस्वारीमध्ये फक्त गट स्टेज किंवा पात्रता सामने आहेत. तरुणदीप राय तिरंदाजीमध्ये दिसणार आहे. तरुणदीप रायचा R64 टॉम हॉलशी मध्ये सामना होईल. हा सामना रात्री 9.28 वाजता सुरू होईल. तरुणदीप रायने हा सामना जिंकून पुढची फेरी गाठली, तर त्याचा दुसरा सामना रात्री १०:०७ वाजता होईल. पॅरिस ऑलिम्पिक 2024 चे प्रसारण हक्क Sports18 कडे आहेत. Sports18 नेटवर्क चॅनेलवर थेट प्रक्षेपण पाहण्याचा पर्याय प्रदान करेल. JioCinema मोबाइल ॲप आणि वेबसाइटवर पुरुषांच्या तिरंदाजी सामन्यांचे थेट प्रवाह पाहण्याचा पर्याय विनामूल्य उपलब्ध असेल.हेही वाचा: PV Sindhu Paris Olympic 2024: पीव्ही सिंधू सलग दुसरा सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत दाखल

पोस्ट पहा:

 

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 31, 2024 07:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).