Odisha Shocker: अवैध संबंधाचे रहस्य झाले उघड; पत्नीने प्रियकरासह पतीची केली हत्या, मृतदेह घरातच पुरला
या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी घरात खोदकाम सुरू केले आणि त्यांना घरात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. प्रकाश नायक असे मृताचे नाव आहे.
Odisha Shocker: ओडिशातील नयागड जिल्ह्यातील कोमांडा गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी री घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने पतीची हत्या करून मृतदेह घरात पुरला. या प्रकरणी मयताच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. अखेर घर खोदून मृतदेह ताब्यात घेतला. अशा प्रकारे अगदी दृश्यम चित्रपटासारखी घटना ओडिशात समोर आली आहे. ओडिशातील कोमांडा गावात 20 दिवसांपूर्वी एक व्यक्ती बेपत्ता झाली होती. याप्रकरणी त्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली होती. यामध्ये तरुणाच्या वडिलांनी आपल्या मुलाची हत्या झाल्याचे सांगितले होते. तसेच तरुणाच्या पत्नीवर खुनाचा आरोप करत, आपल्या मुलाचा खून करून तिने मृतदेह घरात पुरल्याचे त्यांनी सांगितले होते. या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी घरात खोदकाम सुरू केले आणि त्यांना घरात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. प्रकाश नायक असे मृताचे नाव आहे. माहितीनुसार, प्रकाशच्या पत्नीने बाहेर प्रेमसंबंध होते व याच प्रेमप्रकरणातून तिने हे कृत्य केले. सध्या प्रकाशची पत्नी, पत्नीचा प्रियकर आणि तिच्या आईला ताब्यात घेण्यात आले आहे. (हेही वाचा: Brutal Murder of Wife: पत्नीचे कापलेले डोके हातात घेऊन परिसरात फिरत राहिला पती; Valentine's Day दिवशी समोर आली हत्येची धक्कादायक घटना)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)