Odisha Shocker: मुलगी झाली म्हणून वडिलांनी 20 दिवसांच्या मुलीला दिले विषाचे इंजेक्शन, पोलिसांकडून अटक
इंजेक्शन दिल्यानंतर मुलीची तब्येत खराब होऊ लागल्यानंतर तिला गंभीर अवस्थेत बालासोर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील निलागिरीच्या सिघीरी येथे एका व्यक्तीने आपल्या 20 दिवसांच्या तान्ह्या मुलीला विषाचे इंजेक्शन दिले असल्याची धक्काद्स्यक घटना समोर आली आहे. इंजेक्शन दिल्यानंतर मुलीची तब्येत खराब होऊ लागल्यानंतर तिला गंभीर अवस्थेत बालासोर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी या मुलीच्या वडिलांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु आहे. वृत्तानुसार, चंदन महाना असे आरोपीचे नाव असून, मुलगी जन्माला आली म्हणून त्याने तिला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला आहे. (हेही वाचा: दिल्ली पुन्हा हादरली! शहरातील शाहाबाद डेअरी परिसरात 16 वर्षीय तरुणीची दगडाने ठेचून हत्या; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)