Odisha Lok Sabha Election Results: आंध्र प्रदेशनंतर आता ओडिशामध्येही BJP ची मोठी आघाडी; 74 जागांवर पुढे, सत्ता स्थापन करण्याची शक्यता
ओडिशा मध्ये एकूण 147 जागा असून, बहुमतासाठी 74 जागा आवश्यक आहेत. अशात बीजेडी 56, भाजपा 74, काँग्रेस 11 आणि इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत.
Odisha Lok Sabha Election Results: लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल हळू हळू समोर येत आहेत. देशात कोणाची सत्ता येणार याबाबत अजूनतरी चित्र स्पष्ट झाले नसले तरी, काही राज्यांमध्ये भाजपची आघाडी दिसत आहे. आंध्र प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप), तेलगू देसम पार्टी (टीडीपी) आणि जनसेना पक्ष (जेएसपी) यांचा समावेश असलेला एनडीए सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज दिसत आहे. दुसरीकडे, ओडिशामध्येही भाजप आणि एनडीएसाठी चांगली बातमी असू शकते. ओडिशा मध्ये एकूण 147 जागा असून, बहुमतासाठी 74 जागा आवश्यक आहेत. अशात बीजेडी 56, भाजपा 74, काँग्रेस 11 आणि इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत. आंध्रप्रदेशनंतर ओडिशामध्येही भाजप सत्ता स्थापन करू शकते असे दिसत आहे. ओडिशाचे नवीन पटनायक हे मार्च 2000 पासून 24 वर्षे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मात्र यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी झटका देणारी ठरू शकते.
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)