आता Zomato थेट ट्रेनच्या कोचमध्ये पुरवणार जेवण; 100 हून अधिक रेल्वे स्थानकांवर सेवा सुरु, IRCTC शी केली भागीदारी

झोमॅटो तुम्ही निवडलेल्या स्टेशनवर तुमच्या कोचला खाद्यपदार्थ पोहोचवेल.

Zomato (PC - Facebook)

जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल आणि आपल्या कोचमध्ये स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल, तर झोमॅटो (Zomato) तुमच्या दिमतीला असणार आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो आता थेट ट्रेनच्या डब्यांमध्ये जेवण पोहोचवणार आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) दीपंदर गोयल यांनी आज (13 सप्टेंबर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून या निर्णयाची माहिती दिली आहे. कंपनीने यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) सोबत भागीदारी केली आहे. देशातील 100 रेल्वे स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध आहे, असे गोयल यांनी म्हटले आहे. रेल्वे प्रवासादरम्यान थेट डब्यात जेवण ऑर्डर करण्याच्या सुविधेचा लाखो ग्राहकांना फायदा होणार आहे. गोयल म्हणाले की, कंपनीने ट्रेनमध्ये 10 लाखांहून अधिक ऑर्डर आधीच वितरित केल्या आहेत.

झोमॅटोने प्रवाशांची सोय लक्षात घेऊन ही नवीन सुविधा तयार केली आहे. दिल्ली, प्रयागराज, कानपूर, लखनौ, वाराणसी, अहमदाबाद, नागपूर, गोवा, भोपाळ आणि सुरत या प्रमुख शहरांचा समावेश असलेल्या 100 हून अधिक रेल्वे स्थानकांवर ही सेवा उपलब्ध आहे. (हेही वाचा: Zomato Order Scheduling: झोमॅटोने सुरू केली नवीन 'ऑर्डर शेड्युलिंग सेवा', फूड ऑर्डर शेड्यूल करण्याची सुविधा आता उपलब्ध होणार)

आता झोमॅटो थेट ट्रेनच्या कोचमध्ये पुरवणार जेवण-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)