नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ Amartya Sen यांच्या निधनाचे वृत्त निराधार, कन्या नंदना देब सेन यांची माहिती

नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचे निधन झाल्याच्या वृत्ताचे अभिनेत्री नंदना देब सेन यांनी खंडन केले आहे. त्या अमर्त्य सेन यांच्या कन्या आहेत.

Amartya Sen | (PC - x)

नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचे निधन झाल्याच्या वृत्ताचे अभिनेत्री नंदना देब सेन यांनी खंडन केले आहे. त्या अमर्त्य सेन यांच्या कन्या आहेत. आपल्या 'X' (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरुन माहिती देताना त्यांनी म्हटले आहे की, मित्रहो, आपल्या काळजीबद्दल धन्यवाद. मात्र, सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांतून आलेले वृत्त खोटे आहे. बाबा पूर्ण बरे आहेत. त्यांनी नुकताच केंब्रिज येथे कुटुंबीयांसोबत आपला आठवडा छान घालवला. त्यांची मिठी आमच्यासाठीनेहमीप्रमाणेच भक्कम होती. ते केंब्रिजमध्ये आठवड्यातून दोन लेक्चर घेतात. तसेच, एका पुस्तकावरही त्यांचे काम सुरु आहे.

एक्स पोस्ट

दरम्यान, वृत्तसंस्था पीटीआयनेही सुरुवातील त्यांच्या निधनाचे वृत्त दिले होते. मात्र, नंतर ते ट्विट डिलिट करत अशी घटना घडली नसून आगोदरचे ट्विट डिलिट केल्याचे स्पष्टीकरण वृत्तसंस्थेने दुसऱ्या पोस्टमध्ये दिले आहे.

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now