New Parliament Inauguration: विरोधकांच्या निर्णयावरुन त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचे दिसून येते- देवेंद्र फडणवीस
ते लोकशाहीविरोधी होते का? असा सवाल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याबद्दल प्रसारमाध्यमांनी विचारले असता ते बोलत होते.
विरोधकांनी घेतलेल्या निर्णयावरून त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचे दिसून येते. ही केवळ भारताच्या लोकसभेची इमारत नाही, तर ती नव्या भारताच्या ताकदीची इमारत आहे. इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये संसद अॅनेक्सी इमारतीचे उद्घाटन केले, राजीव गांधी यांनी संसदेच्या ग्रंथालयाचे भूमिपूजन केले. ते लोकशाहीविरोधी होते का? असा सवाल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याबद्दल प्रसारमाध्यमांनी विचारले असता ते बोलत होते. (हेही वाचा, New Parliament Inauguration: 'नव्या संसद भवनाच्या इमारतीला शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस उपस्थित राहणार नाहीत')
ट्विट