New FDI Limits For Satellites: एलॉन मस्क यांच्या भारत भेटीच्या आधी अर्थ मंत्रालयाचा मोठा निर्णय; अंतराळ क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीच्या नवीन मर्यादा अधिसूचित केल्या
अंतराळ क्षेत्रातील विदेशी गुंतवणुकीचे उदारीकरण करण्याच्या धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकत्याच दिलेल्या मंजुरीनंतर हा विकास झाला आहे.
New FDI Limits For Satellites: निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील वित्त मंत्रालयाने, विदेशी चलन व्यवस्थापन नियमांतर्गत उपग्रहाशी संबंधित क्रियाकलापांसाठी थेट विदेशी गुंतवणुकीच्या नवीन मर्यादा अधिसूचित केल्या आहेत. यामुळे परदेशी गुंतवणूकदारांना उपग्रह क्षेत्रातील गुंतवणूक योजना वाढवता येतील. अंतराळ क्षेत्रातील विदेशी गुंतवणुकीचे उदारीकरण करण्याच्या धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकत्याच दिलेल्या मंजुरीनंतर हा विकास झाला आहे. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, परदेशी गुंतवणूकदार आता या क्षेत्रात 100 टक्के एफडीआय गुंतवू शकतात. विशेष म्हणजे, ही अधिसूचना टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्या भारत भेटीच्या काही दिवस अगोदर आली आहे. येत्या 21 ते 22 एप्रिल दरम्यान मस्क आपल्या भेटीदरम्यान विविध भारतीय अंतराळ कंपन्यांशी भेट घेणार असल्याची माहिती आहे. (हेही वाचा: Starlink Receives Government Approval: लवकरच भारतामध्ये उपलब्ध होऊ शकते Elon Musk यांच्या स्टारलिंकची इंटरनेट सेवा; मंत्रालयाकडून मिळाली तत्वतः मान्यता)