National Security Advisor: देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून Ajit Doval यांची सलग तिसऱ्यांदा नियुक्ती
अजित डोवाल यांची 20 मे 2014 रोजी पहिल्यांदा देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून डोवाल हे या पदावर आहेत. त्यांच्या आधी शिवशंकर मेनन हे देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते.
National Security Advisor: देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन झाले असून, त्यासोबतच मंत्र्यांनाही मंत्रीपदे देण्यात आली आहेत. आता गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. अजित डोवाल यांची सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) नियुक्ती करण्यात आली आहे. अजित डोवाल यांची 20 मे 2014 रोजी पहिल्यांदा देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून डोवाल हे या पदावर आहेत. त्यांच्या आधी शिवशंकर मेनन हे देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. 1968 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अजित डोवाल हे राजनयिक विचार आणि दहशतवादविरोधी तज्ञ मानले जातात. दुसरीकडे पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पीके मिश्रा यापुढेही ही जबाबदारी सांभाळतील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अजित डोवाल आणि पीके मिश्रा यांच्या पुनर्नियुक्तीला मंजुरी दिली आहे. (हेही वाचा: NEET UG 2024 Result: राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षेत 1,563 उमेदवारांना दिलेले ग्रेस मार्क्स रद्द; NTA येत्या 23 जून रोजी घेणार नवी परीक्षा)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)