Bageshwar Baba: धीरेंद्र शास्त्रींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक, बिष्णोई टोळीच्या नावाने पाठवला होता ईमेल

पैसे न मिळाल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. त्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल झाली. त्याआधारे धमकीचा मेल ट्रेस केल्याने आरोपींना पकडण्यात मदत झाली.

arrest (संग्रहित संपादित प्रतिमा)

बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर पंडित धीरेंद्र शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. छतरपूर पोलिसांनी आरोपीला बिहारची राजधानी पाटणा येथून अटक करून न्यायालयात हजर केले.

नालंदा जिल्ह्यातील आकाश नावाच्या तरुणाने एका खास अॅपद्वारे धीरेंद्र शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याने लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने मेल पाठवून 10 लाखांची खंडणी मागितली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दोन-तीन मेल पाठवले होते. एकूण 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न मिळाल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. त्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल झाली. त्याआधारे धमकीचा मेल ट्रेस केल्याने आरोपींना पकडण्यात मदत झाली.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement