MP: उष्णतेचा कहर! भाजप नेत्याने टेरेसवर आगीशिवाय चक्क उन्हात तळल्या पुऱ्या, व्हिडिओ व्हायरल (Watch)

श्योपूर शहरातील जुन्या बसस्थानकाजवळ राहणाऱ्या भाजप नेत्या कल्पना राठौर यांचा हा व्हिडीओ असून त्यामध्ये त्या गॅस स्टोव्ह किंवा इतर कोणत्याही उपकरणाचा वापर न करता टेरेसवर ठेवलेल्या कढईत पुरी तळत आहे.

टेरेसवर आगीशिवाय चक्क उन्हात तळल्या पुऱ्या

देशात उष्णतेने कहर केला आहे. सध्या ज्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे ते पाहता दुपारच्या वेळेत घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहेत. याआधी राजस्थानमधून एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये एक जवान तापत्या वाळूवर पापड भाजत असल्याचे दिसत होते. आता मध्य प्रदेशमधून असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ एका महिला भाजप नेत्याचा, ज्यामध्ये त्या कडाक्याच्या उन्हात गच्चीवर कोणत्याही आगीशिवाय पुऱ्या तळताना दिसत आहेत. या क्लिपवरून परिसरातील प्रचंड उष्णता स्पष्टपणे समजू शकते. व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

श्योपूर शहरातील जुन्या बसस्थानकाजवळ राहणाऱ्या भाजप नेत्या कल्पना राठौर यांचा हा व्हिडीओ असून त्यामध्ये त्या गॅस स्टोव्ह किंवा इतर कोणत्याही उपकरणाचा वापर न करता टेरेसवर ठेवलेल्या कढईत पुरी तळत आहे. राठोड यांनी जवळजवळ 24 तास ही तेलाची कढई टेरेसवर ठवली होती. त्यानंतर उष्णतेने त्यातील तेल गरम झाले आणि त्यामध्ये पुऱ्या तळल्या. (हेही वाचा: Scorching Heat in Rajasthan: बिकानेरमध्ये पारा 47 अंशांवर; BSF जवानाने चक्क गरम वाळूवर भाजला पापड, व्हिडिओ व्हायरल)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now