Mount Everest: मुंबईच्या 16 वर्षीय गिर्यारोहक Kaamya Karthikeyan ने सर केले माउंट एव्हरेस्ट; शिखरावर फडकवला तिरंगा
काम्याने तिच्या लहान वयात ही असामान्य कामगिरी करून संपूर्ण जगाला प्रेरणा दिली आहे. माउंट एव्हरेस्ट सर करणारी ती भारतामधील सर्वात तरुण महिलांपैकी एक ठरली आहे, यासह ती नेपाळच्या बाजूने माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण भारतीय आणि जगातील दुसरी सर्वात तरुण मुलगीही ठरली आहे.
Kaamya Karthikeyan Scales Mount Everest: एखादी गोष्ट करायची जिद्द असेल तर, ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी व्यक्ती सर्व प्रकारे प्रयत्न करते. ही ओळ मुंबईची काम्या कार्तिकेयन आणि तिचे वडील एस कार्तिकेयन यांना उत्तम प्रकारे लागू होते. या बाप-लेकीने केलेली कामगिरी भारतासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या दोघांनी 8849 मीटर उंच माउंट एव्हरेस्टवर 20 मे रोजी यशस्वी चढाई केली. महत्वाचे म्हणजे काम्या फक्त 16 वर्षांची आहे. काम्या मुंबईच्या नेव्ही चिल्ड्रन स्कूलमध्ये 12 वीच्या वर्गात शिकत आहे. या खडतर प्रवासात आपल्या मुलीला साथ देणारे तिचे वडील एस. कार्तिकेयन हे भारतीय नौदलात कमांडर आहेत.
काम्याने तिच्या लहान वयात ही असामान्य कामगिरी करून संपूर्ण जगाला प्रेरणा दिली आहे. माउंट एव्हरेस्ट सर करणारी ती भारतामधील सर्वात तरुण महिलांपैकी एक ठरली आहे, यासह ती नेपाळच्या बाजूने माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण भारतीय आणि जगातील दुसरी सर्वात तरुण मुलगीही ठरली आहे. काम्याने आतापर्यंत सहा पर्वत चढून जगातील सातही खंडांतील सर्वोच्च शिखर सर करण्याचे आपले ध्येय पूर्ण केले आहे. या डिसेंबरमध्ये तिला अंटार्क्टिकामधील माऊंट विन्सन मासिफ चढून ‘7 समिट’ आव्हान पूर्ण करणारी सर्वात तरुण मुलगी बनायची आहे. काम्या मुळची झारखंडची रहिवासी असून ती सध्या मुंबईमध्ये शिकत आहे. (हेही वाचा: Jharkhand Shocker: इंस्टाग्राम रीलसाठी 100 फूटावरुन पाण्यात उडी मारणाऱ्या तरुणाचा मृत्यू, झारखंडमधील घटना)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)