मुंबई पोलिसांनाही Money Heist ची भुरळ; Khakhi Band ने सादर केले 'Bella Ciao' थीम सॉंग (Watch Viral Video)

गेल्या अनेक महिन्यांपासून नेटफ्लिक्सची लोकप्रिय सिरीज मनी हाईस्टच्या सीझन 5 ची (Money Heist Season 5) उत्सुकता होती. आता आज हा सिझन जगभरातील नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे

मुंबई पोलिसांनाही Money Heist ची भुरळ; Khakhi Band ने सादर केले 'Bella Ciao' थीम सॉंग (Watch Viral Video)
मुंबई पोलिसांनी सादर केले Bella Ciao (Photo credit : Twitter)

गेल्या अनेक महिन्यांपासून नेटफ्लिक्सची लोकप्रिय सिरीज मनी हाईस्टच्या सीझन 5 ची (Money Heist Season 5) उत्सुकता होती. आता आज हा सिझन जगभरातील नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे व त्यानंतर सोशल मिडियावर याच सिरीजबाबत चर्चा सुरु आहे. महत्वाचे म्हणजे या सिरीजची भुरळ मुंबई पोलिसांनाही पडली आहे. या सिरीजमधील गाणे ‘बेला चाओ’ हे अगदी पहिल्या सिझनपासून लोकप्रिय ठरले आहे, आता ‘खाकी बँड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई पोलीस बँडने ‘बेला चाओ’ हे थीम साँग सादर केले आहे. सध्या सोशल मिडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नेटिझन्सकडून मुंबई पोलिसांचे कौतुक होत आहे.

मुंबई पोलिसांनी सादर केले Money Heist चे थीम सॉंग Bella Ciao

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2021 07:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).