Men on Scooter, Bike Crash Into McLaren Supercar: बंगळुरूमध्ये रील बनवताना कोट्यावधी रुपयांच्या मॅकलरेन सुपरकारला स्कूटरची धडक, जाणून घ्या काय घडले पुढे (Watch Video)

बेंगळूरूच्या रस्त्यावरून 12 कोटी रुपयांची मॅक्लारेन 765 LT सुपरकार धावत आहे. या कारला पाहण्यासाठी रस्त्यावर बरीच गर्दी झाली आहे. एक व्यक्ती रील्ससाठी या कारचा व्हिडिओ बनवत आहे. इतक्याच अचानक रस्त्यावरून जाणाऱ्या एका स्कूटरची धडक या कारला बसते.

Bike Crash Into McLaren Supercar

Men on Scooter, Bike Crash Into McLaren Supercar in Bengaluru: भारतात सुपरकार दिसणे हे फारसे सामान्य नाही. म्हणूनच, जेव्हा कोट्यावधी किमतीची सुपरकार शहरात नजरेस पडते तेव्हा तिला पाहण्यासाठी लोक उत्साहित होतात. मात्र, ही बाब अशा कार मालकांसाठी अडचणीची ठरू शकते. अलीकडेच, बंगळुरू शहरात एका मॅकलरेन सुपरकारचा एका स्कूटरसोबत अपघात झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या मॅकलरेन आणि स्कूटर अपघाताचा व्हिडिओ विहान रामचंद्र यांच्या सौजन्याने इन्स्टाग्रामवर समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बेंगळूरूच्या रस्त्यावरून कोट्यावधी रुपयांची मॅक्लारेन 765 LT सुपरकार धावत आहे. या कारला पाहण्यासाठी रस्त्यावर बरीच गर्दी झाली आहे. एक व्यक्ती रील्ससाठी या कारचा व्हिडिओ बनवत आहे. इतक्याच अचानक रस्त्यावरून जाणाऱ्या एका स्कूटरची धडक या कारला बसते. या धडकेनंतर सुपरकार तशीच पुढे जाते, मात्र स्कूटरवरील दोघेही खाली पडतात.  सुदैवाने यामध्ये कोणाला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र कारचे काही नुकसान झाले आहे की नाही हे समजू शकले नाही. हा व्हिडिओ बेंगळुरू शहरातील विठ्ठल मल्ल्या रोडचा असल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा: Viral Video: काश्मीरच्या बर्फाळ रस्त्यावर धावणारा टांगा पाहून लोकांनी केली स्वर्गाशी तुलना, पहा व्हिडिओ)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement