Manu Kumar Jain Quits Xiaomi Group: मनु कुमार जैन यांनी दिला पदाचा राजीनामा; घेतला 9 वर्षानंतर शाओमीमधून बाहेर पडण्याचा निर्णय

त्यांनी आज 30 जानेवारी रोजी सोशल मिडियावर ही माहिती दिली.

Manu Kumar Jain

मनु कुमार जैन यांनी Xiaomi ग्रुपमधून राजीनामा दिला आहे. 9 वर्षांहून अधिक काळ ते कंपनीशी जोडले गेले होते. आता त्यांनी कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. जैन Xiaomi चे ग्लोबल व्हाइस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत होते. त्यांनी आज 30 जानेवारी रोजी सोशल मिडियावर ही माहिती दिली. त्यांनी शेअर केलेल्या निवेदनात जैन म्हणाले की, ‘गेली नऊ वर्षे खरोखरच अद्भुत होती. चाहते, भागीदार, टीम मेंबर्स आणि मित्रांकडून मला मिळालेले प्रेम आणि समर्थनाचा मी आदर करतो. मी भाग्यवान आहे की मला इतका छान अनुभव मिळाला. येथून निरोप घेणे कठीण आहे.’ जैन यांनी 2014 मध्ये Xiaomi मध्ये सामील झाल्यानंतर, कंपनीमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. 2014 ते 2017 अशी तीन वर्षे ते भारतात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, Xiaomi सह त्यांच्या कार्यकाळाच्या तीन वर्षांत कंपनी भारतातील नंबर 1 स्मार्टफोन ब्रँड बनली आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)