Manipur Violence: मणिपूर मधील महिलांवरून क्रुर अत्याचारांच्या वायरल व्हिडीओ ची SC कडूनही दखल; सरकारला तातडीने कारवाईचे निर्देश
Solicitor General Tushar Mehta यांनी कोर्टाला सांगताना हा प्रकार स्वीकारला जाऊ शकत नसल्याचं म्हटलं आहे.
मणिपूर मधील महिलांच्या विवस्त्र धिंड काढून नंतर अत्याचार करण्याच्या प्रकारावर आता सर्वोच्च न्यायालयाने देखील संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडीयामध्ये काल वायरल झालेल्या या घटनेचा सार्याच स्तरातून निषेध केला जात आहे.सर्वोच्च न्यायालयाने देखील स्वतःतून या प्रकरणाची दखल घेत केंद्र आणि राज्य सरकारला याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सरन्यायाधीश DY Chandrachud, न्यायमूर्ती PS Narasimha आणि Manoj Misra यांच्या खंडपीठाने या प्रकारणी महिलेला वस्तूप्रमाणे वापरण्याच्या प्रकाराला लाजीरवाणं म्हटलं आहे. Solicitor General Tushar Mehta यांनी कोर्टाला सांगताना हा प्रकार स्वीकारला जाऊ शकत नसल्याचं म्हटलं आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)