Man Repeatedly Rapes His Grandmother: सिक्कीममध्ये 24 वर्षीय नातवाचा आपल्या 80 वर्षांच्या आजीवर अनेकवेळा बलात्कार, हायकोर्टाने कायम ठेवली आरोपीची शिक्षा

हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर, पिडीतेने नमूद केले की, आरोपी नातू मद्यधुंद अवस्थेत तिचा पाठलाग करत असे आणि तिला अयोग्यरित्या स्पर्श करत असे. कोर्टात सादर केलेले पुरावे पाहिल्यानंतर ट्रायल कोर्टाने आरोपीला दोषी ठरवले.

Stop Rape | Representational Image (Photo Credits: File Image)

Man Repeatedly Rapes His Grandmother: सिक्कीममधून महिलांविरोधातील गुन्ह्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी आपल्या 80 वर्षीय आजीवर 24 वर्षांच्या नातवाने एकदा नव्हे तर अनेक वेळा बलात्कार केला आहे. सिक्कीम उच्च न्यायालयाने या व्यक्तीला दोषी ठरवले आहे. जानेवारी-फेब्रुवारी 2022 मध्ये पहिल्यांदा आरोपीने महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर त्याच वर्षी मार्च-एप्रिल आणि एप्रिल-मेमध्ये अशाच घटना घडल्या. 8 मे 2022 रोजी पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली. पीडित महिला तिची मुलगी, जावई आणि नातवासोबत राहत होती. पिडीतेची मुलगी (आरोपीची आई) पश्चिम बंगालच्या सहलीला गेली होती. जेव्हा ती परत आली तेव्हा वृद्ध पिडीत महिला घरी सापडला नाही. नंतर तिला कळले की, आपली आई शेजाऱ्याच्या घरी आहे. मुलीने जेव्हा आईला घरी बोलावले तेव्हा तिने घरी परतण्यास नकार दिला. त्यानंतर खोदून विचारले असता, पिडीत महिलेने बलात्काराचा खुलासा केला.

त्यानंतर याबाबत नातवाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर, पिडीतेने नमूद केले की, आरोपी नातू मद्यधुंद अवस्थेत तिचा पाठलाग करत असे आणि तिला अयोग्यरित्या स्पर्श करत असे. कोर्टात सादर केलेले पुरावे पाहिल्यानंतर ट्रायल कोर्टाने आरोपीला दोषी ठरवले. ट्रायल कोर्टाच्या आदेशाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिथेही उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाचा आदेश कायम ठेवत, आरोपी नातवाला दिलासा देण्यास नकार दिला. ट्रायल कोर्टाने आरोपीला सश्रम कारावासासह जन्मठेपेची शिक्षा, तसेच प्रत्येक बलात्कारासाठी 10,000 रुपये दंड ठोठावला होता. यासह गुन्हेगारी धमकीसाठी दोन वर्षांचा तुरुंगवास आणि 1000 दंडाची शिक्षा सुनावली होती. (हेही वाचा: Karnataka Shocker: प्रसूतीदरम्यान डॉक्टरांनी कापले बाळाचे गुप्तांग; नवजात मुलाचा मृत्यू, कुटुंबियांची कारवाईची मागणी)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now