Maharashtra Cabinet Decision: अनाथांना मिळणार एक टक्का आरक्षण, नोकरी करणाऱ्या महिलांसाठी राबवली जाणार वसतिगृहाची योजना; राज्य सरकारचे मोठे निर्णय

आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, अनाथांना एक टक्का आरक्षण लागू करण्याचा आणि नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Yashomati Thakur | (Photo Credits: Facebook)

आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, अनाथांना एक टक्का आरक्षण  लागू करण्याचा आणि नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाने यासाठी मान्यता दिल्यामुळे महानगरांप्रमाणेच जिल्ह्यांच्या ठिकाणी नोकरी करणाऱ्या महिलांना सुरक्षित असे निवासाचे ठिकाण मिळणार असून, त्यांच्या प्रगतीच्या संधी विस्तारतील असे मत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)