मंत्रालयातील शिपाई महादेव निवाते यांचे कोरोना उपचारादरम्यान निधन; Dhananjay Munde यांनी वाहिली श्रद्धांजली
याबाबत धनंजय मुंडे यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली आहे
मंत्रालयातील शिपाई महादेव निवाते यांचे निधन झाले आहे. याबाबत धनंजय मुंडे यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली आहे. ते म्हणतात. 'मंत्रालयातील माझ्या कार्यालयात कार्यरत शिपाई महादेव निवाते यांचे कोरोना उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.सदैव कार्यतत्पर,अत्यंत मनमिळावू आणि सगळ्यांच्याच गळ्यातील ताईत असे आमचे सहकारी स्व.महादेव निवाते यांना भावपूर्ण श्रद्धांजली.आम्ही सर्वजण निवाते परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. कोरोनामुळे आमच्यातील एक प्रेमळ सहकारी आम्ही गमावला आहे. प्रत्येकाने कोरोनाविषयक नियमांचे पालन करणे व स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.'
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)