Madhya Pradesh: 400 फूट खोल बोअरवेलमध्ये 6 वर्षाचा मुलगा पडला; बचावकार्य सुरू (Watch)

बाळाच्या सुटकेसाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 50 फुटावर तन्मय अडकला आहे.

मुलगा बोअरवेलमध्ये पडला

मध्य प्रदेशच्या बेतूल जिल्ह्यातील आठनेर ब्लॉकच्या मांडवी गावात मंगळवारी संध्याकाळी सहा वर्षीय तन्मय खेळत असताना 400 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, बाळाच्या सुटकेसाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 50 फुटावर तन्मय अडकला आहे. शेतकरी सुनील दियाबर यांनी आठ दिवसांपूर्वी शेतात 400 फूट खोल बोअर खोदला होता. या घटनेबाबत बैतूलचे जिल्हाधिकारी अमनवीर सिंग बैस म्हणाले, मुलाला बोअरवेलमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. घटनास्थळी दोन जेसीबी मशीन पाठवण्यात आल्या आहेत. तहसीलदारांसह वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी हजर आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement