Madhavi Raje Scindia Passes Away: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मातोश्री माधवी राजे सिंधिया यांचे निधन; दिल्ली एम्समध्ये चालू होते उपचार

सिंधिया राजघराण्याची सून होण्यापूर्वी माधवी राजे यांचे नाव किरण राज लक्ष्मी होते. त्या नेपाळच्या राजघराण्यातील आहे. 8 मे 1966 रोजी ग्वाल्हेरचे तत्कालीन महाराज माधवराव सिंधिया यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

Madhavi Raje Scindia Passes Away: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मातोश्री माधवी राजे सिंधिया यांचे निधन; दिल्ली एम्समध्ये चालू होते उपचार
Madhavi Raje Scindia Passes Away

Madhavi Raje Scindia Passes Away: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आई माधवी राजे सिंधिया यांचे निधन झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्या दिल्ली एम्समध्ये दाखल होत्या. दिल्ली एम्समध्ये सकाळी 9.28 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्या काही काळ व्हेंटिलेटरवर होत्या. निवडणुकीदरम्यानही त्यांची तब्येत अनेकदा बिघडली, त्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया आणि इतर कुटुंबीयांना निवडणूक प्रचार सोडून दिल्लीला जावे लागले होते. त्यांच्या निधनामुळे दिल्लीपासून मध्य प्रदेशापर्यंत शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने ग्वाल्हेर राजघराण्याचे मोठे नुकसान झाले आहे.

सिंधिया राजघराण्याची सून होण्यापूर्वी माधवी राजे यांचे नाव किरण राज लक्ष्मी होते. त्या नेपाळच्या राजघराण्यातील आहे. 8 मे 1966 रोजी ग्वाल्हेरचे तत्कालीन महाराज माधवराव सिंधिया यांच्याशी त्यांचा विवाह झाला. राजघराण्यातील असूनही माधवी राजे यांनी नेहमी पडद्यामागे काम केले. राजकारणात त्या कधीच सक्रिय झाल्या नाहीत. (इही वाचा: Fire Erupts at Income Tax office in Delhi: दिल्लीतील आयकर कार्यालयाला लागलेल्या आगीत एका अधिकाऱ्याचा मृत्यू; 7 जणांची सुटका)

पहा पोस्ट-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 15, 2024 11:56 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).