Lok Sabha Elections 2024 Satta Bazar Prediction: देशात नवे सरकार कोणाचे? NDA की INDIA आघाडी? जाणून घ्या पालनपूर सट्टा बाजाराचा अंदाज

Congress, BJP | (File Image)

Lok Sabha Elections 2024 Satta Bazar Prediction: लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडले. त्यानंतर आता एक्झिट पोलचे निकालही समोर येत आहेत. एक्झिट पोलपूर्वीच देशातील मोठ्या 10 सट्टेबाजी बाजारांनी त्यांचे अंदाज जाहीर केले आहेत. यामध्ये पालनपूर सट्टा बाजार हे एक महत्वाचे नाव आहे. पालनपूर सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार यंदा भाजपला 216 जागा मिळण्याची शक्यता आहे तर एनडीएला 247 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे पालनपूर सत्ता बाजाराच्या अंदाजानुसार, इंडिया ब्लॉकला 225 जागा आणि काँग्रेसला 112 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, फलोदी, पालनपूर, कर्नाल, बोहरी, बेळगाव, कोलकाता, विजयवाडा सट्टा बाजारांनी एनडीए आणि विरोधी आघाडी इंडिया यांच्यात निकराची लढत होण्याची शक्यता वर्तवली आहे, तर इंदूर सराफ आणि सुरत माघोबी यांनी एनडीएला स्पष्ट बहुमत दिले आहे. (हेही वाचा: Exit Poll 2024 Live Streaming On Aaj Tak: सत्तेची हॅटट्रिक करण्यापासून NDA ला रोखू शकेल INDIA युती? एक्झिट पोलचे निकाल 'आज तक'वर पाहू शकाल लाइव्ह)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now