Exit Poll 2024 Live Streaming On Aaj Tak: सत्तेची हॅटट्रिक करण्यापासून NDA ला रोखू शकेल INDIA युती? एक्झिट पोलचे निकाल 'आज तक'वर पाहू शकाल लाइव्ह
अंतिम निकालापूर्वी निवडणुकीतील विजय किंवा पराभवाचा फक्त अंदाज एक्झिट पोलद्वारे घेतला जातो. एक्झिट पोलचे आकडे कधी बरोबर तर कधी चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आहे.
Exit Poll 2024 Live Streaming On Aaj Tak: लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल 4 जून रोजी घोषित केले जातील. तत्पूर्वी आज (1 जून) मतदानाचा 7वा टप्पा पूर्ण झाल्यानंतर, संध्याकाळी विविध माध्यम वाहिन्या आणि सर्वेक्षण संस्थांद्वारे एक्झिट पोल जाहीर केले जातील. देशात कोणता पक्ष सरकार स्थापन करू शकतो? कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? याचा अंदाज या पोलमधून येणार आहे. एक्झिट पोल हे एक प्रकारचे निवडणूक सर्वेक्षण आहे. मतदानाच्या दिवशी मतदार मतदान करून मतदान केंद्राबाहेर पडल्यानंतर, त्याला विविध सर्वेक्षण संस्था आणि वृत्तवाहिन्यांच्या लोकांकडून मतदानाबाबत काही प्रश्न विचारले जातात व मतदारांनी दिलेल्या उत्तरांच्या डेटावरून एक्झिट पोल जाहीर होतात. आज संध्याकाळी तुम्ही आज तक (Aaj Tak) या हिंदी वृत्तवाहिनीवर एक्झिट पोलचे निकाल थेट पाहू शकाल. आज 1 जून रोजी संध्याकाळी 6.30 नंतर एक्झिट पोल जाहीर होतील.
अंतिम निकालापूर्वी निवडणुकीतील विजय किंवा पराभवाचा फक्त अंदाज एक्झिट पोलद्वारे घेतला जातो. एक्झिट पोलचे आकडे कधी बरोबर तर कधी चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आहे. दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 303 जागा जिंकल्या होत्या. एनडीएला 351 जागा मिळाल्या होत्या, तर यूपीएला 90 जागा मिळाल्या होत्या. त्या निवडणुकीत काँग्रेसला 52 जागा मिळाल्या होत्या.
या ठिकाणी थेट पहा आज तक वृत्तवाहिनीवर एक्झिट पोलचे निकाल-
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 01, 2024 06:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

