Lok Sabha Elections 2024 Satta Bazar Prediction: देशात नवे सरकार कोणाचे? NDA की INDIA आघाडी? जाणून घ्या पालनपूर सट्टा बाजाराचा अंदाज
Lok Sabha Elections 2024 Satta Bazar Prediction: लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडले. त्यानंतर आता एक्झिट पोलचे निकालही समोर येत आहेत. एक्झिट पोलपूर्वीच देशातील मोठ्या 10 सट्टेबाजी बाजारांनी त्यांचे अंदाज जाहीर केले आहेत. यामध्ये पालनपूर सट्टा बाजार हे एक महत्वाचे नाव आहे. पालनपूर सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार यंदा भाजपला 216 जागा मिळण्याची शक्यता आहे तर एनडीएला 247 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे पालनपूर सत्ता बाजाराच्या अंदाजानुसार, इंडिया ब्लॉकला 225 जागा आणि काँग्रेसला 112 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, फलोदी, पालनपूर, कर्नाल, बोहरी, बेळगाव, कोलकाता, विजयवाडा सट्टा बाजारांनी एनडीए आणि विरोधी आघाडी इंडिया यांच्यात निकराची लढत होण्याची शक्यता वर्तवली आहे, तर इंदूर सराफ आणि सुरत माघोबी यांनी एनडीएला स्पष्ट बहुमत दिले आहे. (हेही वाचा: Exit Poll 2024 Live Streaming On Aaj Tak: सत्तेची हॅटट्रिक करण्यापासून NDA ला रोखू शकेल INDIA युती? एक्झिट पोलचे निकाल 'आज तक'वर पाहू शकाल लाइव्ह)
पहा पोस्ट-
What is the Satta Bazar predicting?
- Palanpur Satta Bazaar:
- NDA: 247 seats
- I.N.D.I.A: 225 seats@padmajajoshi, @navikakumar & @madhavgk take us through Satta Bazar numbers.#ExitPoll #ElectionsWithTimesNow #LokSabhaElections2024 pic.twitter.com/up9k7UOz6N
— TIMES NOW (@TimesNow) June 1, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 01, 2024 07:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

