Lift Collapses in Noida: नोएडाच्या सेक्टर 137 मधील सोसायटीमध्ये लिफ्ट कोसळली; वृद्ध महिलेचा मृत्यू
माहिती मिळताच देखभाल विभागाचे कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लिफ्ट उघडण्याचा प्रयत्न सुरू केला. लिफ्ट उघडण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे लागल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.
गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये लिफ्ट बिघडल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. आता गुरुवारी इथे एक मोठी दुर्घटना घडली. नोएडा सेक्टर-१३७ च्या पारस टिएरा सोसायटीमध्ये लिफ्ट तुटल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. हा प्रकार सोसायटीतील लोकांना समजताच सर्वजण जमा झाले आणि एकच गोंधळ उडाला. माहितीनुसार, पारस टिएरा हाउसिंग सोसायटीच्या टॉवर क्रमांक 24 च्या आठव्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक 803 मध्ये 70 वर्षीय सुशीला देवी आपला मुलगा आणि सुनेसोबत राहतात. गुरुवारी संध्याकाळी काही कामानिमित्त त्या खाली जात होत्या. त्या लिफ्टमध्ये चढताच अचानक लिफ्टची वायर तुटली. त्यामुळे त्या लिफ्टमध्येच अडकून राहिल्या. लिफ्ट मधल्या मजल्यावर अडकली. माहिती मिळताच देखभाल विभागाचे कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लिफ्ट उघडण्याचा प्रयत्न सुरू केला. लिफ्ट उघडण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे लागल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. घाईघाईत उपस्थित लोकांनी महिलेला जवळच्या फेलिक्स रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी वृद्ध महिलेला मृत घोषित केले. (हेही वाचा: फिरोजाबादमध्ये पोलीस कर्मचारी दिनेश मिश्रा यांच्यावर गुंडांनी झाडल्या गोळ्या; उपचारादरम्यान मृत्यू)
VIDEO | One dead as a lift collapses at a society in sector 137 in Noida, UP. More details are awaited. pic.twitter.com/lusCbaJsdy
— Press Trust of India (@PTI_News) August 3, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 03, 2023 11:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

