लेस्बियन कपल Adhila Nassrin आणि Fathima Noora यांना एकत्र राहण्याची परवानगी; केरळ उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

आदिलाने तिच्या पार्टनरला बळजबरीने वेगळे केल्यामुळे कोर्टात ही याचिका दाखल केली होती

लेस्बियन कपल Adhila Nassrin आणि Fathima Noora (Photo Credit : Twitter)

केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी एक मोठा निर्णय देत, लेस्बियन कपल आदिला नसरीन (22) आणि फातिमा नूरा (23) यांना एकत्र राहण्याची परवानगी दिली. यासंदर्भात आदिला नसरीनने हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. आदिलाने तिच्या पार्टनरला बळजबरीने वेगळे केल्यामुळे कोर्टात ही याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती के विनोद चंद्रन आणि सी जयचंद्रन यांच्या खंडपीठाने लेस्बियन जोडप्याशी थेट संवाद साधत त्यांना एकत्र राहायचे आहे का? असा सवाल केला. दोघींनीही 'हो' असे उत्तर दिले त्यानंतर कोर्टाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला आणि त्यांना एकत्र राहण्याची परवानगी दिली.आदिलाने सांगितले की या दोघी शालेय दिवसांपासून एकत्र आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)