Kotakfyn: कोटक महिंद्रा बँकेने सुरु केले 'कोटक फिन'; मिळणार पेपरलेस व्यवहारासह अनेक सुविधा, घ्या जाणून

हे व्‍यासपीठ अनेक लॉगइन्‍स व विविध युजर इंटरफेसेसची आवश्‍यकता दूर करते, ज्‍यामुळे सर्व व्‍यापार व सेवा व्‍यवहार ग्राहकांसाठी एकसंधी व सोईस्‍कर बनतात.

Kotak Mahindra Bank (Photo Credits: ANI)

कोटक महिंद्रा बँक (KMB) आज विशेषत: बिझनेस बँकिंग व कॉर्पोरेट क्‍लायंट्ससाठी विकसित केलेले सर्वांगीण डिजिटल व्‍यासपीठ ‘कोटक फिन’सह कार्यरत झाली आहे. नवीन समाविष्‍ट करण्‍यात आलेले हे पोर्टल कोटक बँकेच्‍या ग्राहकांना व्‍यापार व सेवा, खाते सेवा, पेमेंट्स व कलेक्‍शन्‍स अशा सर्व उत्‍पादनांमध्‍ये सर्वसमावेशक डिजिटल बँकिंग व मूल्यवर्धित सेवा देईल. कोटक फिनचे सिंगल व्‍यासपीठ ग्राहकांसाठी गुंतागूंत व त्रास कमी करते. हे व्‍यासपीठ अनेक लॉगइन्‍स व विविध युजर इंटरफेसेसची आवश्‍यकता दूर करते, ज्‍यामुळे सर्व व्‍यापार व सेवा व्‍यवहार ग्राहकांसाठी एकसंधी व सोईस्‍कर बनतात. कोटक फिन पोर्टल पेपरलेस व्‍यवहार व सुविधेची खात्री देते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement