Kota: राजस्थानच्या कोटामध्ये 3 कोचिंग विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या; दोघे एकाच वसतिगृहात राहत होते
मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थ्यांपैकी दोन बिहार आणि एक मध्य प्रदेशातील आहे. या तिघांचे वय 16, 17 आणि 18 वर्षे होते.
राजस्थानमधील कोटा येथे कोचिंगमध्ये शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थ्यांपैकी दोन बिहार आणि एक मध्य प्रदेशातील आहे. या तिघांचे वय 16, 17 आणि 18 वर्षे होते. मृत विद्यार्थ्यांमध्ये अंकुश आणि उज्ज्वल हे दोघेही बिहारचे विद्यार्थी एकाच वसतिगृहात राहत होते. एक इंजिनीअरिंगची तर दुसरा मेडिकलची तयारी करत होता. प्रणव हा मध्य प्रदेशचा विद्यार्थी NEET ची तयारी करत होता. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय परीक्षांच्या तयारीसाठी कोटा देशभर प्रसिद्ध आहे. मात्र, अलीकडच्या काळात येथे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Indian Students Dies In Car Accident In America: अमेरिकेत कार अपघातात 2 भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
Civil Defence Course For Engineering Students: अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी नागरी संरक्षण अभ्यासक्रम सुरु करण्याची महाराष्ट्र सरकारची योजना; शिक्षणासोबतच देशसेवा करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार संधी
HSC Study Stress Management: इयत्ता 12वी अभ्यासाचा ताण, विद्यार्थ्यांच्या यशासाठी पालकांनी काय काळजी घ्यावी?
HSC Study Techniques for Students: इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास सातत्य आणि उत्साह टिकवण्यासाठी काय करावे? घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement