Khalistan Zindabad Before World Cup: धर्मशाळेच्या भिंतीवर 'खालिस्तान जिंदाबाद' लिहिल्याने विश्वचषक सामन्यापूर्वी खळबळ; पोलिसांकडून तपास सुरु

पोलिसांनी हे सर्व पुसून टाकले आणि या प्रकरणावर कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले आहे.

विश्वचषकाचे सामने होण्यापुर्वी धर्मशाळेत खालिस्तान जिंदाबाद लिहल्याचे आढल्याने खळबळ उडाली आहे. तिबेटी आध्यात्मिक गुरु दलाई लामा यांचे घर असलेल्या हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा शहरातील सरकारी इमारतीच्या भिंतींवर काही बदमाशांनी “खलिस्तान जिंदाबाद” असे लिहिल्याचे आढळून आले. पोलिसांनी हे सर्व पुसून टाकले आणि या प्रकरणावर कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले आहे.

यापूर्वी शिखांसाठी वेगळा देश निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या फुटीरतावादी चळवळीतील खलिस्तानचे पोस्टर्स गेल्या वर्षी मे महिन्यात येथील राज्य विधानसभेच्या कॅम्पसच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आले होते.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement