Dev Deepavali 2023: देव दिवाळीनिमित्त वाराणसीचा राजघाट मातीच्या दिव्यांनी उजळला, पाहा व्हिडिओ
या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केला होता, म्हणून भगवान शिवाचे शहर वाराणसीमध्ये हा उत्सव अधिक थाटामाटात साजरा केला जातो.
काशी शहर वाराणसीमध्ये देव दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. देव दिवाळीनिमित्त वाराणसीतील राजघाटावर लाखो दिव्यांची रोषणाई करण्यात आल्याने ते मातीच्या दिव्यांनी उजळले होते. असे म्हणतात की कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला देव स्वतः पृथ्वीवर अवतरतात आणि दिवे लावून दिवाळी साजरी करतात. या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केला होता, म्हणून भगवान शिवाचे शहर वाराणसीमध्ये हा उत्सव अधिक थाटामाटात साजरा केला जातो.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)