Karnataka: हसनच्या हसनंबा मंदिरात मोठा अपघात, विजेची तार तुटल्याने भाविकांना बसला विजेचा धक्का बसला; घटनेनंतर चेंगराचेंगरी (Watch Video)
जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर समोर आला आहे.
कर्नाटक राज्यातील हसनमधील हसनांबा मंदिरात विजेची तार तुटल्याने काही लोकांना विजेचा धक्का लागल्याची घटना समोर आली आहे. या अपघातानंतर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर समोर आला आहे. याबाबत हसनचे एसपी मोहम्मद सुजिथा सांगतात, ‘दुपारी 1.30 च्या सुमारास वायर तुटल्यामुळे विजेचा शॉक लागला. यामुळे लोक घाबरले आणि चेंगराचेंगरी झाली. सध्या KEB आणि HESCOM अधिकारी येथे आहेत. ते तपास करत आहेत. यातील काही जणांना हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. इथल्या मंदिरामध्ये दर्शनासाठी वेळ कमी आहे, त्यामुळे गर्दी जास्त आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहेत.’ (हेही वाचा: Air Pollution: वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)