Karnataka: टोमॅटो विकून 40 लाख रुपये कमावणाऱ्या शेतकऱ्याने खरेदी केली SUV; आता आहे वधूच्या शोधात

राजेश कुमार असे याचे नाव असून त्याने या हंगामात 40 ते 45 लाख रुपये कमावले आहेत.

Tomato | representative pic- (photo credit -pixabay)

एकीकडे टोमॅटोने सर्वसामान्यांसाठी नवे संकट उभे केले असतानाच, अनेक शेतकऱ्यांसाठी ही संकटे एक संधी म्हणून पुढे आली आहेत. गेल्या काही दिवसांत अशाच एका शेतकऱ्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्याने टोमॅटो विकून लाखो रुपये कमावले होते. आता तोच शेतकरी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कर्नाटकातील चामराजनगर येथील शेतकरी टोमॅटो विकून रातोरात खूप श्रीमंत झाला. राजेश कुमार असे याचे नाव असून त्याने या हंगामात 40 ते 45 लाख रुपये कमावले आहेत. राजेशने सांगितले की, त्याने या हंगामात टोमॅटो विकल्यानंतर एक SUV खरेदी केली.

चांगले जीवन जगण्यासाठी योग्य पैसे कमावल्याने राजेश आता वधूच्या शोधात आहे. तो म्हणाला, ‘मी शेतकरी असल्याने पूर्वी मला अनेक मुलींनी नाकारले होते. कारण अनेक मुलींना सरकारी नोकरी करणारा किंवा कॉर्पोरेट नोकरी असलेला मुलगा हवा होता. मात्र आता हे सिद्ध झाले आहे की, योग्य वेळ आल्यास शेतकरी नोकरी करणाऱ्या कर्मचार्‍यांपेक्षा जास्त पैसे कमवू शकतात.’ (हेही वाचा: Theft of Tomato: OMG! झारखंडमध्ये दुकानातून 40 किलो टोमॅटोची चोरी; 66 दुकानांमधील भाजीपाला लुटला, चौकशी सुरू)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)