Kanpur Shocker: प्रेमासाठी कायपण! लिंग बदलून पुरुषाचा बाई झाला पण प्रियकराने दगा दिला; आग लावून बदला घेतला, वाचा सविस्तर (Video)
इंदूरचा रहिवासी असलेला दीप नावाचा मुलगा शहरातील एका रेस्टॉरंट मालकाचा मुलगा वैभव शुक्लाच्या प्रेमात पडला. कालांतराने या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. पुढे वैभवशी लग्न करण्यासाठी तरुणाने लाखो रुपये खर्चून आपले लिंग बदलले
यूपीच्या कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे इंदूरचा रहिवासी असलेला दीप नावाचा मुलगा शहरातील एका रेस्टॉरंट मालकाचा मुलगा वैभव शुक्लाच्या प्रेमात पडला. कालांतराने या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. पुढे वैभवशी लग्न करण्यासाठी तरुणाने लाखो रुपये खर्चून आपले लिंग बदलले व तो दीपचा दीपा झाला. मात्र त्यानंतर वैभवने एका ट्रान्सजेंडरशी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर पिडीत ट्रान्सजेंडरने इंदूरच्या विजय नगर पोलीस ठाण्यात आपल्या कथित प्रियकराविरुद्ध फसवणूक, लैंगिक संबंध आणि अनैसर्गिक संबंधांचा गुन्हा दाखल केला आहे. आता दीपाने रागाच्या भरात सूड उगवण्यासाठी या रेस्टॉरंट मालकाच्या घराबाहेर उभी असलेली कार पेट्रोल टाकून पेटवून दिली आहे. दीप उर्फ दीपा आपल्या साथीदारासह कानपूरला आली व इथे तिने ही गाडी पेटवून दिली. दीपाचा हेतू होता की, त्याने गाडीला आग लावल्यावर संपूर्ण घर आगीत होरपळून निघेल, पण तसे होऊ शकले नाही. आग लागल्याचे समजताच आजूबाजूच्या लोकांनी त्यावर नियंत्रण मिळवले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. सध्या या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. (हेही वाचा: Bengaluru Shocker: बेंगलूरू मध्ये पत्नीने लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट न मिळाल्याने झोपेत असलेल्या पतीवर केले चाकू हल्ले!)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)