Explosion Inside the Vehicle in Anantnag: जम्मू कश्मीरच्या अनंतनाग मध्ये वाहनात स्फोट, 4 जखमी
जखमी चार जण वैद्यकीय उपचारांसाठी नजिकच्या रूग्णालयात दाखल आहेत.
जम्मू कश्मीरच्या अनंतनाग मधील Larkipora भागात एका वाहनात स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 4 जण जखमी झाले आहेत. Kashmir News Observer ला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही जण जम्मू कश्मीरचे रहिवासी नाहीत. त्यांच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलिस आणि अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून स्फोटाचा अधिक तपास सुरू आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)