Indus Waters Treaty: पाकिस्तानला 1960 च्या सिंधू जल करारात बदल करण्यासाठी भारताने बजावली नोटीस

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पाकिस्तानसोबतच्या सिंधू पाणी करारावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, भारताने 25 जानेवारीला पाकिस्तानला नोटीस बजावली आहे.

Indus Water Treaty (Photo Credit: PTI)

सप्टेंबर 1960 च्या सिंधू जल करारात सुधारणा करण्याबाबत भारताने पाकिस्तानला नोटीस बजावली आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानसोबत सिंधू जल कराराची अंमलबजावणी करण्यासाठी भारत हा दृढ समर्थक, जबाबदार भागीदार आहे, परंतु पाकिस्तानच्या कृतीमुळे सिंधू करारातील तरतुदींवर विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे भारताला नोटीस बजावणे भाग पडले आहे. सिंधू जल कराराचे उल्लंघन सुधारण्यासाठी पाकिस्तानला 90 दिवसांच्या आत आंतर-सरकारी वाटाघाटी करण्याची संधी देणे हा या नोटिशीचा उद्देश आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पाकिस्तानसोबतच्या सिंधू पाणी करारावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, भारताने 25 जानेवारीला पाकिस्तानला नोटीस बजावली आहे. याबाबत अजून पाकिस्तान किंवा जागतिक बँकेकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. कराराचे भौतिक उल्लंघन सुधारण्यासाठी पाकिस्तानला वाटाघाटी करण्याची संधी देण्यासाठी ही नोटीस जारी केली आहे. वाटाघाटीसाठी पाकिस्तानला योग्य तारीख सूचित करण्याचे आवाहन केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now