Indore Akola Bus Accident: इंदौर कडून अकोला कडे जाणार्‍या बसला अपघात; करोली घाटात कोसळली बस

अपघाताची माहिती मिळताच बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली असून पोलिस, अ‍ॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल आहेत.

Bus | Pixabay.com

इंदौर कडून अकोला ला जाणार्‍या खाजगी बसचा मोठा अपघात झाला आहे.

जळगाव जामोद - बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात बस 100 फूच खोल दरीत कोसळल्याची घटना समोर आहे. या अपघातामध्ये 28 जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या जखमींवर नजिकच्या बुरहानपूर मधील हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली असून पोलिस, अ‍ॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल आहेत. बसचा अपघात पहाटे 5.30 च्या सुमारास झाला आहे.

इंदौर कडून अकोला कडे जाणार्‍या बसला अपघात

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement