Indian Stock Market Updates: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांचा परिणाम भारतीय बाजारावर; सेन्सेक्स 3,380 अंकांनी घसरून 71,985 वर उघडला

रविवारी संध्याकाळी वॉल स्ट्रीट फ्युचर्समध्ये सुमारे 4% घसरण झाली, तर आशिया-पॅसिफिक प्रदेशातील बाजार 4-6% घसरले. जागतिक बाजारपेठेतील गोंधळाचे प्रतिबिंब भारतीय शेअर बाजारांवर पडत आहे.

Indian Stock Exchange | Photo Credits: ANI)

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे, जागतिक व्यापार युद्धाची भीती निर्माण झाली आहे. याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर तर झालाच आहे, याशिवाय आज भारतीय बाजारपेठेवरही याचा परिणाम दिसून आला. मोठ्या घसरणीमुळे सोमवारी बाजार उघडताच भारतीय बेंचमार्क इक्विटी निर्देशांक, बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी50 मध्ये घसरण झाली.ओपनिंग बेलवर, बीएसई सेन्सेक्स 3,379.19 अंकांनी (किंवा 4.48%) घसरून 71,985.50 वर होता आणि सध्या 72,179 वर व्यवहार करत आहे. यासह निफ्टी50 901.05 अंकांनी (किंवा 3.93%) घसरून 22,003.40 वर होता.

रविवारी संध्याकाळी वॉल स्ट्रीट फ्युचर्समध्ये सुमारे 4% घसरण झाली, तर आशिया-पॅसिफिक प्रदेशातील बाजार 4-6% घसरले. जागतिक बाजारपेठेतील गोंधळाचे प्रतिबिंब भारतीय शेअर बाजारांवर पडत आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या मोठ्या प्रमाणात करवाढीच्या बरोबरीने चीननेही नुकसान झाले. यामुळे व्यापार युद्धाचे धोके वाढले आहेत, परिणामी मंदीची लाट येऊ शकते अशी शक्यता आहे.

Indian Stock Market Updates:

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement