Passport Office Servers Down: भारतातील पासपोर्ट कार्यालयाचे सर्व्हर डाउन? अर्जदारांना मुंबई, पुणे, पाटणा आणि इतर शहरांतील पासपोर्ट कार्यालयांमध्ये करावा लागला अडचणींचा सामना

अर्जदारांनी तक्रार केली की, पासपोर्ट सेवा केंद्राच्या कार्यालयातील सर्व्हर डाउन झाले असून त्यांना भेटींचे वेळापत्रक पुन्हा रिशेड्यूल करण्यास सांगण्यात आले आहे. यातील एका वापरकर्त्याने भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांना टॅग करत पासपोर्ट सेवा सर्व्हर डाउन झाल्याचं म्हटलं आहे.

Overcrowding in Patna Passport Office (Photo Credits: X/@mohmmad_ab38771)

Passport Office Servers Down: मुंबई, पुणे, पाटणा आणि इतर शहरातील पासपोर्ट कार्यालयाचे सर्व्हर डाउन (Passport Office Server Down) झाल्याच्या तक्रारी अर्जदारांनी केल्या आहेत. अर्जदारांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीनुसार, मुंबई, पुणे, पाटणा आणि इतर शहरांतील पासपोर्ट कार्यालयांमध्ये ((Passport Office) त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. अर्जदारांनी तक्रार केली की, पासपोर्ट सेवा केंद्राच्या कार्यालयातील सर्व्हर डाउन झाले असून त्यांना भेटींचे वेळापत्रक पुन्हा रिशेड्यूल करण्यास सांगण्यात आले आहे. यातील एका वापरकर्त्याने भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांना टॅग करत पासपोर्ट सेवा सर्व्हर डाउन झाल्याचं म्हटलं आहे. आमच्यापैकी काहीजण पुन्हा कार्यालयाला भेट देऊ शकत नाही. कृपया याकडे लक्ष द्या आणि आज ज्यांच्या अपॉईंटमेंट होत्या त्यांची प्रक्रिया केली जाईल, याची खात्री करण्यात मदत करा, असं या वापरकर्त्याने आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे. आणखी एका वापरकर्त्याने पाटणा पासपोर्ट कार्यालयातील फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये पासपोर्ट कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं दिसत आहे.

भारतातील पासपोर्ट कार्यालयाचे सर्व्हर डाउन? 

अर्जदाराची परराष्ट्र मंत्र्यांकडे तक्रार - 

पाटणा पासपोर्ट कार्यालयातील गर्दी - 

 

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now