India New Year 2025 Celebration: भारतामध्ये नवीन वर्ष 2025 ला सुरुवात; देशभरात मोठ्या उत्साहात झाले स्वागत

देशभरात ठिकठिकाणी आतिषबाजी केली जात आहे. लोक एकत्र जमून एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. यासह अनेकांनी धार्मिक स्थळांवर आशीर्वाद घेऊन नवीन वर्षाची सुरुवात केली.

Happy New Year 2025 (File Image)

India New Year 2025 Celebration: जगभरातील अनेक देशांनी नवीन वर्ष 2025 चे स्वागत मोठ्या उत्साहात केले. आता भारतही त्यामध्ये सामील झाला आहे. भारतामध्ये नुकतेच नवीन वर्ष सुरु झाले. अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारतात नववर्षाचे स्वागत केले जात आहे. 2024 च्या शेवटच्या दिवसाला लोकांनी निरोप दिला असून, नवीन वर्षाच्या आनंदात ते मग्न झाले आहेत. देशभरात ठिकठिकाणी आतिषबाजी केली जात आहे. लोक एकत्र जमून एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. यासह अनेकांनी धार्मिक स्थळांवर आशीर्वाद घेऊन नवीन वर्षाची सुरुवात केली. यावेळी मुंबईमधील मरीन ड्राईव्हसह अनेक बीचेसवर लोकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. (हेही वाचा: World Population: नववर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारी 2025 रोजी जगाची लोकसंख्या 8.09 अब्जांवर पोहोचेल; गेल्या 12 महिन्यांत झाली 71 दशलक्षांची वाढ)

India New Year 2025 Celebration:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now