IND vs NZ 3rd Test 2024 Day 3 Live Score Update: भारताला दुसरा धक्का, शुभमन गिल 1 धाव करून बाद; टीम इंडियाला विजयासाठी अजून 130 रन्सची आवश्यकता
भारताला विजयासाठी 147 धावांची आवश्यकता आहे. भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही खराब झालेली पहायला मिळाली. रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर शुभमन गिलनेही आपली विकेट स्वस्तात गमावली .
Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team, 3rd Test Match Day 3 Live Streaming: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Series) तिसरा सामना 1 नोव्हेंबरपासून खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंड संघाने 59.4 षटकांत नऊ गडी गमावून 171 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या 44 धावा करून संघाचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. दुसऱ्या डावात न्यूझीलंड संघाने 143 धावांची आघाडी घेतली होती. आजच्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर रविंद्र जाडेजाने भारताला पहिले यश लवकर मिळवून दिले. भारताला विजयासाठी 147 धावांची आवश्यकता आहे. भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही खराब झालेली पहायला मिळाली. रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर शुभमन गिलनेही आपली विकेट स्वस्तात गमावली .
पाहा पोस्ट -
3RD Test. WICKET! 3.6: Shubman Gill 1(4) b Ajaz Patel, India 16/2 https://t.co/Vz7cIv1znY #INDvNZ @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) November 3, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 03, 2024 10:15 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

