HC On Husband Wife and Mental Cruelty: 'कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्याऐवजी पती मद्यपानाच्या आहारी जात असेल तर, ही कुटुंबासाठी मानसिक क्रूरता'; Chhattisgarh HC चे निरीक्षण
हा अर्ज कौटुंबिक न्यायालयाकडून फेटाळण्यात आला होता.
छत्तीसगड उच्च न्यायालयाने एका प्रकरणावर निर्णय देताना निरीक्षण नोंदवले की, जर पती आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्याऐवजी मद्यपानाच्या आहारी जात असेल आणि त्यामुळे कौटुंबिक स्थिती बिघडत असेल तर ही बाब पत्नी आणि मुलांसह संपूर्ण कुटुंबासाठी मानसिक क्रूरता आहे. न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि न्यायमूर्ती संजय एस. अग्रवाल यांच्या खंडपीठाने असेही म्हटले आहे की, जर मुले विवाहबंधनातून जन्माला आली असतील, वडिलांना आपल्या जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत, विशेषतः त्यांची आई काम करत नसेल तर.
या निरीक्षणांसह, न्यायालयाने अलीकडेच क्रूरतेच्या कारणास्तव घटस्फोटाची मागणी करणारा पत्नीचा अर्ज मंजूर केला. हा अर्ज कौटुंबिक न्यायालयाकडून फेटाळण्यात आला होता. या आदेशाला पत्नीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या जोडप्याचे फेब्रुवारी 2006 मध्ये लग्न झाले आणि त्यांच्या विवाहातून एक मुलगा आणि एक मुलगी झाली. जेव्हा त्यांचा मुलगा 10 वर्षांचा होता आणि मुलगी 13 वर्षांची होती, तेव्हा पत्नीने पतीच्या अति मद्यपानाच्या सवयीमुळे घटस्फोट घेण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता पतीचे हे कृत्य मानसिक क्रूरता असल्याचे सांगत न्यायालयाने घटस्फोटाची याचिका मंजूर केली. (हेही वाचा: HC on Live-In and Domestic Violence: लिव्ह-इन रिलेशनशिपमधील महिलादेखील दाखल करू शकते घरगुती हिंसाचाराचा खटला- Kerala High Court)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)