Horrific Accident: कर्नाटकातील रायचूरमध्ये भरधाव कारने दिली दुचाकीस्वारासह दोन मुलींना धडक; समोर आला अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ (Watch)

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक दुचाकीस्वार यू-टर्न घेत आहे, तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने चार विद्यार्थिनी चालत जात आहेत. अचानक एक भरधाव कार येते व प्रथम दुचाकीला व त्यानंतर दोन मुलींना तिची धडक बसते.

Accident (PC - File Photo)

कर्नाटकातील रायचूरमध्ये एका भरधाव कारने दुचाकी आणि दोन विद्यार्थिनींना जोरात धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धडक दिल्यानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. 18 जुलै रोजी स्थानिक स्टेशन रोडवर असलेल्या श्री राघवेंद्र पेट्रोल पंपाजवळ एक दुचाकी चालक रस्ता ओलांडत असताना ही घटना घडली.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक दुचाकीस्वार यू-टर्न घेत आहे, तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने चार विद्यार्थिनी चालत जात आहेत. अचानक एक भरधाव कार येते व प्रथम दुचाकीला व त्यानंतर दोन मुलींना तिची धडक बसते. या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे, तर ज्योती आणि शिवमंगला या दोन विद्यार्थिनींना दुखापत झाली आहे. शिवराज पाटील असे दुचाकी चालकाचे नाव असून तो रायचूरच्या कुलसुंबी बारंगे येथील रहिवासी आहे. या घटनेबाबत रायचूर वाहतूक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. (हेही वाचा: Train -Truck Accident Video: ट्रेनची ट्रकला धडक, घटनेचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now