HC On Victim Having Sexual Experience and Resistance: 'जर सेक्सचा अनुभव असलेल्या महिलेने लैंगिक अत्याचारावेळी पुरेसा प्रतिकार केला नाही, तर ती कृती तिच्या इच्छेविरुद्ध नव्हती'; Orissa High Court ने बलात्काराच्या आरोपीची केली निर्दोष मुक्तता

पिडीत महिलेले दाखल केलेल्या एफआयआरनुसार, 16 मार्च 2014 रोजी ती सायंकाळच्या वेळी एकटीच घरी परतत असताना, आरोपीने तिला लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.

Orissa High Court

ओरिसा हायकोर्टाने अलीकडेच एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली आहे. कोर्टाने नमूद केले की, ज्या महिलेला लैंगिक संबंधांचा अनुभव आहे ती या व्यक्तीच्या जबरदस्तीच्या कृत्याला प्रतिकार करण्यास अपयशी ठरली. कोर्टाने सांगितले की, ‘पीडित एक महिला आहे आणि तिला सेक्सचा अनुभव आहे, अशात तिच्याशी एकट्यात लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपीला पुरेसा प्रतिकार करण्यात ती अयशस्वी ठरली. त्यामुळे एकतर तिच्यात शक्ती नव्हती असे मानता येईल किंवा हे कृत्य तिच्या इच्छेविरुद्ध नव्हते.’ त्यामुळे न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

पिडीत महिलेले दाखल केलेल्या एफआयआरनुसार, 16 मार्च 2014 रोजी ती सायंकाळच्या वेळी एकटीच घरी परतत असताना, आरोपीने तिला लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर ट्रायल कोर्टाने अपीलकर्त्याला आयपीसीच्या कलम ३७६(२)(एफ) अंतर्गत गुन्ह्यासाठी दोषी ठरवले. या निर्णयाविरोधात आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली. जिथे समोर आले की, पीडितेच्या वैद्यकीय तपासणीमध्ये, तिच्यावर कोणतीही शारीरिक दुखापत नव्हती आणि नुकत्याच झालेल्या लैंगिक संभोगाची कोणतीही चिन्हे आणि लक्षणे नव्हती. तसेच रक्तस्त्राव झालेल्या जखमांचा कोणताही पुरावा नव्हता. या अहवालाचा विचार करून, न्यायालयाने असे मत मांडले की, महिलेने अपीलकर्त्याने केलेल्या कृत्याचा निषेध किंवा प्रतिकार केला नाही. त्यामुळे या कृत्यास तिचीही सहमती असल्याचे दिसून येते. (हेही वाचा: CJI DY Chandrachud यांनी मणीपूर प्रश्नावरुन वकीलाला झापले, म्हटले 'Whataboutery चालणार नाही')

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)