HC On Mother Forced To Deliver In Middle Of Road: रस्त्यावर प्रसूत महिलेला Community Health Centre मध्येही योग्य मदत न मिळाल्याने दगावली जुळी मुलं; कोर्टाने सरकरला फटकारले
राजस्थान उच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला एकत्रितपणे महिलेला 4 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत
राजस्थान मध्ये Community Health Centre मध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे एका आईने जुळी मुले गमावल्याची घटना समोर आली आहे. या महिलेला रस्त्यावरच बाळांना जन्म द्यावा लागला. त्यानंतर Community Health Centre मध्येही मदत न मिळाल्याने महिलेने बाळं गमावणं ही 'माणुसकीचा मृत्यू' असल्याचे सांगत, राजस्थान उच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला एकत्रितपणे महिलेला 4 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती अनूप कुमार धांड यांच्या खंडपीठाने राज्य आणि केंद्र सरकारांना Welfare Schemes च्या अंमलबजावणीच्या दृष्टीने प्रभावीपणे सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)