HC on Marriage: 'कोणत्याही कारणाशिवाय जोडीदाराचा त्याग करणे म्हणजे क्रूरता, हा हिंदू विवाहाची भावना आणि आत्म्याचा मृत्यू'- Allahabad High Court

लग्नाच्या काही वर्षांनी दोन्ही पक्ष वेगळे झाले. मात्र, ते काही काळ एकत्र आले आणि नंतर 1999 मध्ये पुन्हा वेगळे झाले.

Allahabad High Court (PC - Wikimedia commons)

हिंदू विवाहात कोणत्याही वैध कारणाशिवाय जोडीदाराला सोडणे म्हणजे त्या जोडीदारावर क्रूरता आहे, असे मत अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केले. न्यायमूर्ती सौमित्र दयाल सिंग आणि दोनाडी रमेश यांच्या खंडपीठाने सांगितले की, ‘हिंदू विवाह हा एक संस्कार आहे, कोणता सामाजिक करार नाही, जिथे एक जोडीदार कोणत्याही कारणाशिवाय दुसऱ्या जोडीदाराचा त्याग करतो. जेव्हा असे आचरण घडते, तेव्हा संस्कार आपला आत्मा गमावतो. कोणत्याही कारणाशिवाय जोडीदाराला सोडल्यास हिंदू विवाहाच्या आत्म्याचा आणि भावनेचा झालेला मृत्यू हे, त्या जोदादारावर क्रूरता ठरू शकते.

अहवालानुसार, दोन्ही पक्षांचे 1989 मध्ये लग्न झाले होते आणि 1991 मध्ये त्यांच्या मुलाचा जन्म झाला होता. लग्नाच्या काही वर्षांनी दोन्ही पक्ष वेगळे झाले. मात्र, ते काही काळ एकत्र आले आणि नंतर 1999 मध्ये पुन्हा वेगळे झाले. त्यानंतर पुन्हा एकदा ते एकत्र राहू लागले, अखेर 2001 मध्ये ते वेगळे झाले आणि तेव्हापासून ते वेगळे राहत आहेत. याबाबत कौटुंबिक न्यायालय, झाशी यांनी दिलेल्या घटस्फोटविरोधात पत्नीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. (हेही वाचा: HC on Taking Care of Aged In-laws: महिलेने वृद्ध सासू-सासऱ्यांची काळजी न घेणे म्हणजे क्रूरता नव्हे; Allahabad High Court ने फेटाळली पतीची घटस्फोटाची याचिका)