HC On Father Raping Minor Daughter: बलात्काराचा आरोप असलेल्या वडिलांना दिलासा नाही; 'मुलींना देवी म्हणून पूजले जाते', Orissa High Court चे निरिक्षण
'ज्या ठिकाणी महिलांची पूजा केली जाते, तेथे देवता वास करतात, जिथे स्त्रियांचा सन्मान होतो तिथे देवत्व फुलते,' असे न्यायालयाने म्हटले आहे.
Orissa High Court On Father Raping Minor Daughter: ओरिसा उच्च न्यायालयाने अलीकडेच एका व्यक्तीची त्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ठोठावण्यात आलेली शिक्षा कायम ठेवली आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाचे न्यायाधीश संगम कुमार साहू यांच्या एकल खंडपीठाने सांगितले की, मुलींची देवी म्हणून पूजा केली जाते. अशा परिस्थितीत बलात्कारासारख्या जघन्य गुन्ह्यासाठी आरोपी वडिलाला दिलासा देता येणार नाही. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आरोपी वडिलांच्या शिक्षेत कोणताही दिलासा मिळाला नाही.
'ज्या ठिकाणी महिलांची पूजा केली जाते, तेथे देवता वास करतात, जिथे स्त्रियांचा सन्मान होतो तिथे देवत्व फुलते,' असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाचे हे निरीक्षणमहिलांना सन्मानाने आणि आदराने कसे वागवले जावे याचे महत्त्व अधोरेखित करते. माहितीनुसार, या आरोपी वडिलांनी अल्पवयीन मुलीवर जुलै 2015 पासून लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली होती. पुढे एक वर्षानंतर ही बाब समोर आल्यानंतर मुलीच्या आईने आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली. (हेही वाचा: पत्नीला पॉर्न वेबसाइटवर सेक्स करण्यासाठी पतीकडून जबरदस्ती; सासऱ्याने कॉल गर्ल्सना बोलावून दाखवला Sex करण्याचा डेमो, गुन्हा दाखल)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)