HC on Denial of Sex by Spouse: 'जोडीदाराने सेक्ससाठी नकार देणे ही मानसिक क्रूरता'- Delhi High Court

आपल्या पत्नीची आपण घर जावई म्हणून राहावे अशी इच्छा आहे, तसेच ती आपल्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास नकार देत असल्याचे सांगून, पतीने घटस्फोटाची याचिका दाखल केली होती.

Delhi High Court | (Photo Credits: PTI)

मंगळवारी (1 नोव्हेंबर 2023) घटस्फोटाच्या खटल्याची सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. या प्रकरणात एका पतीने आपल्या पत्नीविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. आपल्या पत्नीची आपण घर जावई म्हणून राहावे अशी इच्छा आहे, तसेच ती आपल्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास नकार देत असल्याचे सांगून, पतीने घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. अशा परिस्थितीत 'पती किंवा पत्नीने आपल्या जोडीदारासोबत सेक्स करण्यास नकार देणे म्हणजे मानसिक क्रूरता', असे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र न्यायालयाने पुढे असेही म्हटले की, जेव्हा एका जोडीदाराने दीर्घ कालावधीसाठी जाणूनबुजून शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला असेल तरच ती क्रूरता मानली जाऊ शकते. या प्रकरणात असे नाही, त्यामुळे न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने पतीच्या बाजूने दिलेला निर्णय फेटाळला ज्यामध्ये दोघांच्या घटस्फोटाला मान्यता दिली होती. (हेही वाचा: 'सासरी पत्नीला पतीच्या अटींवर राहण्यासाठी खाजगी मालमत्ता किंवा बंदी कामगारासारखे वागवले जाऊ शकत नाही'- Chhattisgarh HC)

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement