Hathras Stampede: हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 116 लोकांचा मृत्यू; सरकारचे चौकशीचे आदेश
या संपूर्ण घटनेचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयातून मागवण्यात आला आहे.
Hathras Stampede: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मंगळवारी एक मोठी दुर्घटना घडली. सिकंदरराव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलराई गावात आयोजित भोले बाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी होऊन यामध्ये महिला आणि लहान मुलांसह 116 जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. डीजीपी आणि गृह सचिव घटनास्थळी पोहोचून मदतकार्याचा आढावा घेत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पीएम मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पीएम मोदींनी लोकसभेतही या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले होते. हाथरस घटनेत मोठ्या कारवाईची तयारी सुरू आहे. आयोजन समितीसह स्थानिक प्रशासनावर कारवाई करण्यात येणार आहे. या संपूर्ण घटनेचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयातून मागवण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी हाथरस येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. (हेही वाचा: Hathras Stampede: जाणून घ्या कोण आहेत भोले बाबा, ज्यांच्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत 100 हून अधिक जणांनी गमावला आपला जीव)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)